आणखी एका स्कायवॉकमुळे प्रवाशांची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण केले जात असून एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱया प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी स्कायवॉक उभारला जात आहे. रविवारी या स्कायवॉकच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून दोन पेनच्या साहाय्याने स्कायवॉकचे भाग एकमेकाला जोडले जात आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना लवकरच आणखी एक स्कायवॉक उपलब्ध होणार आहे.
रेल्वेस्थानकात यापूर्वी स्थानकाच्या मध्यभागी स्कायवॉक बांधण्यात आला आहे. परंतु रेल्वे प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन नैर्त्रुत्य रेल्वेने आणखी एक स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वेस्थानकाच्या डाव्या बाजूला हा नवा स्कायवॉक उभारण्यात येत आहे. यामुळे एकाच स्कायवॉकवर पडणारा भार काही प्रमाणात कमी होणार आहे.
बऱयाचवेळा अचानक काही कारणास्तव प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये बदल करण्यात येतो. त्यावेळी प्रवाशांची धावपळ उडते. इंजीनच्या बाजूला असणाऱया रेल्वे डब्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना स्कायवॉकपर्यंत पळत येत दुसऱया प्लॅटफॉर्मवर जावे लागते. हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी आणखी एक स्कायवॉक उभारला जात आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत सदर काम पूर्ण होण्याची शक्मयता कर्मचाऱयांनी व्यक्त केली.