रेल्वे सूत्रांकडून माहिती : शिवप्रेमींमध्ये समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करताना मुख्य प्रवेशद्वारावर क्रांतीकारक व बेळगावच्या संबंधित घटनांचे शिल्प कोरण्यात आले होते. परंतु त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प नसल्याने शिव व भीम प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत होती. काही संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी रेल्वे खात्याला निवेदनही दिले होते. याची दखल घेत बेळगाव रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प लवकरच उभारले जाणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
आमदारांकडूनही पाठपुरावा
स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर क्रांतीकारक व देशभक्तांची कोरीव शिल्पे बसविण्यात आली आहेत. कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, स्वामी विवेकानंद, कॉंग्रेस विहीर, कमल बस्ती यांची शिल्पे बसविण्यात आली आहेत. परंतु यामध्ये छत्रपती शिवाजी महराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत होता. श्रीराम सेना, म. ए. युवा समितीने नैर्त्रुत्य रेल्वे विभागाला निवेदन दिले तर बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते.
वरि÷ पातळीवर हालचाली गतिमान
संघटनांचा वाढता दबाव लक्षात घेऊन रेल्वे विभागाने ही दोन्ही शिल्पे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात वरि÷ पातळीवर हालचाली गतिमान झाल्या असून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे बसविण्याची तयारी केली जात असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे लवकरच ही दोन्ही शिल्पे बसविली जाणार आहेत.