पाहणी करून आमदार अनिल बेनके यांनी केली अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वे स्टेशनसमोरील बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. मात्र, सदर काम संथगतीने सुरू असल्याने याची पाहणी आमदार अनिल बेनके यांनी मंगळवारी केली. रेल्वे स्थानकाचे काम तातडीने पूर्ण करण्यासह येथील स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले ठेवण्याची सूचना स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना केली.
रेल्वेस्थानकासमोरील बसस्थानकावरून दक्षिण भागातील बसची ये-जा सुरू असते. त्यामुळे या बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर कामाची सुरुवात करून महिना उलटला पण कामाला गती नसल्याने काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण होणे अशक्मय आहे. या बसस्थानकावरून दक्षिण भागातील गावातील बस थांबतात. पण काम सुरू असल्याने बस थांबण्यास अडथळा निर्माण झाला आहे. बसस्थानकाच्या कामाकरिता दोन्ही प्रवेशद्वारे पत्रे लावून बंद करण्यात आली आहेत. बसस्थानकाच्या आवारात स्वच्छतागृह असून त्या ठिकाणी ये-जा करण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कामाची गती वाढविण्याची गरज आहे. येथील समस्यांबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याची दखल घेऊन आमदार अनिल बेनके यांनी मंगळवारी सकाळी बसस्थानकाच्या विकासकामाची पाहणी केली. येथील माहिती घेऊन काम तातडीने पूर्ण करण्यासाठी गती वाढविण्याची सूचना केली.
येथील प्रवेशद्वार बंद असल्याने परिसरातील व्यावसायिकांसह प्रवाशांना स्वच्छतागृहाला ये-जा करता येत नाही. परिणामी गैरसोय होत आहे. विशेषत: महिलावर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी अधिकाऱयांकडे विचारणा करून प्रवेशद्वार खुले करण्याची सूचना केली. प्रवाशांना आणि व्यावसायिकांना स्वच्छतागृहाकडे ये-जा करण्यासाठी नागरिकांना मार्ग करून देण्याची सूचना आमदारांनी केली.
यावेळी स्थानिक व्यावसायिक आणि रिक्षाचालकांनी आमदारांची भेट घेऊन रस्त्यासंदर्भात तक्रार केली. रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावर भगदाड पडले असून यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. सध्या माती घालून ते बुजविण्यात आले आहे. पण काही दिवसांनंतर पुन्हा या ठिकाणी खड्डा निर्माण होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची विनंती केली. त्यामुळे याची पाहणी करून कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांना विविध सूचना केल्या..