प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटनेच्या एका वरिष्ठ नेत्याने बैठक घेतली होती. या बैठकीला कोकण रेल्वेचे कर्मचारी आणि संघटनेची काही लोक उपस्थित होते. बैठक घेतलेल्या संघटनेचा बाहेरुन आलेला पदाधिकारी त्याच्या राज्यात गेल्यावर आता नंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाला.
तसेच या पदाधिकायांने दुस्रया राज्यातून रत्नागिरीत येताना कोकण रेल्वेतून प्रवास केला होता. बैठकीनंतर पुन्हा दुस्रया राज्यात प्रवास केला. त्यामुळे कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर चिंतेत अधिक भर पडली आहे
कोकण रेल्वेच्या मान्यता प्राप्त संघटनेच्या (NRMU) काही पदाधिकायांनी जिह्यात अनधिकृतपणे प्रवास केल्याचे पुढे येत आहे. ते एवढय़ावरच न थांबता कोकण रेल्वेच्या कर्मचारी तसेच अधिकाऱयांसमवेत बैठकही घेतली. त्यानंतर चार दिवस मान्यता प्राप्त संघटनेचा पदाधिकारी हा रत्नागिरीत ठाण मांडून होता.
कारवार येथून तीन राज्यातून प्रवास करत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे (एनआरएमयु) कार्याध्यक्ष कृष्णनकुमार लक्ष्मण शेट रत्नागिरी कार्यालयात आले होते. त्यांनी रत्नागिरीत काही रेल्वेच्या अधिकायांसोबत बैठक घेतली. तसेच सिंधुदुर्गातून आलेले दोन पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते, असे रेल्वे कर्मचाऱयांनी सांगितले.
22 जून 2020 रोजी आरआरएम कार्यालायत कोकण रेल्वेच्या काही अधिकायांसोबत बैठकी घेतली. ही बैठक सकाळी 11 वाजल्यापासून सुरु होती. या बैठकीला सिंधुदुर्ग जिह्यातून नॅशनल रेल्वे मजदूर युनियन संघटनेचे दोन पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच स्थानिक पदाधिकारीही सहभागी झाले होते. ही बैठक अधिकृत होती.
कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटनेच्या एका पदाधिकाऱयाला कोविडची बाधा झाल्याने तो पदाधिकारी वावरलेल्या सर्व ठिकाणी काम करणाऱया कर्मचाऱयांच्या मनात धाकधुक निर्माण झाली आहे. रत्नागिरीत वावरलेल्या आणि बाधा झालेल्या कर्मचाऱयांनी प्रवासाविषयी योग्य परवानग्या व काळजी घेतली होती का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.