प्रतिनिधी / बेळगाव
दोन दिवसांपूर्वी सुळेभांवी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या अनोळखीची ओळख पटली आहे. मंगळवारी तरुण भारतमध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीवरुन मृताची ओळख पटविण्यात आली आहे.
मारुती लक्ष्मण जोगाणी (वय 50, रा. सिध्देश्वरनगर, कणबर्गी) असे त्याचे नाव आहे. मानसिक अस्वस्थपणातून त्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगीतले. सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली होती.
या संबंधी मंगळवारी तरुण भारतमध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. या बातमीवरुन मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आहे. आपल्याला कोरोना झाला आहे का?, कॅन्सर सारखा आजार जडला आहे का? या संशयाने मारुती त्रस्त होता. त्यामुळे झालेल्या मानसिक अस्वस्थपणातून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.