स्पेशलच्या नावाखाली धावताहेत रेग्युलर रेल्वे : ज्येष्ठांसह दिव्यांगांना आर्थिक फटका : सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वे सुरू करण्यात आल्या खऱया. परंतु या रेल्वेंना स्पेशल रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेकडून तिकिटांमध्ये दिल्या जाणाऱया सर्व सवलती बंद करण्यात आल्या आहेत. याचा फटका दिव्यांग, ज्ये÷ नागरिक, विधवा, विद्यार्थ्यांसह इतरांना बसत आहे. त्यांना पूर्ण तिकीट भरून प्रवास करावा लागत असल्याने सवलतीच्या दरात पुन्हा तिकीट उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकातून देशातील महत्त्वाच्या शहरांना रेल्वेसेवा उपलब्ध आहे. बेंगळूर, मुंबई, तिरुपती, गोवा, दिल्ली, चंदीगड, पुणे यासह इतर शहरांना रेल्वेने ये-जा करता येते. त्यामुळे दररोज शेकडो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात. परंतु स्पेशल रेल्वे धावत असल्यामुळे तिकिटांमध्ये प्रवाशांना सवलत मिळत नाही. दिव्यांगांसह ज्ये÷ नागरिक तसेच इतर वर्गातील व्यक्तींना रेल्वे प्रवासात सवलत दिली जाते. परंतु स्पेशल रेल्वेंमुळे या सर्व सवलती रेल्वे विभागाने बंद केल्या आहेत.
रेल्वेच्या क्रमांकासमोरील ‘शून्य’ कधी जाणार?
मार्च 2020 पासून बंद असणाऱया रेल्वे जून 2020 मध्ये सुरू झाल्या. परंतु तेव्हा त्या रेल्वेंचे क्रमांक बदलण्यात आले असून त्यांच्यासमोर शून्य लावण्यात आला आहे. सोडण्यात येणाऱया स्पेशल रेल्वेंच्या क्रमांकासमोर शून्य क्रमांक लावण्यात येतो. त्यामुळे जोवर हा रेल्वे क्रमांकासमोर शून्य आहे तोवर ही स्पेशल रेल्वे धावते असे समजावे.
दिव्यांगांना सवलतीची गरज
बेळगाव जिल्हय़ाचा विचार केल्यास यामध्ये 20 हजारांहून अधिक दिव्यांग आहेत. यापैकी 700 ते 800 प्रत्येक महिन्याला प्रवास करीत असतात. अनेकांना व्यवसाय उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक चणचण असताना त्यातच रेल्वेकडून देण्यात येणारी सवलतदेखील बंद करण्यात आली आहे. कोरानानंतर आता सर्व सुरळीत सुरू असल्याने रेल्वेने या सवलती पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
यांना मिळतात तिकिटांमध्ये सवलती…
भारतीय रेल्वेकडून तिकिटांवर एकूण 51 प्रकारच्या सवलती देण्यात येतात. या सर्व सवलती 20 मार्च 2020 पासून बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी, विधवा, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, कलाकार, खेळाडू, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होतो. यामध्ये त्या-त्या प्रतवारीनुसार तिकिटांमध्ये सवलती देण्यात येतात.
– गिरीष सव्वाशेरी (सेपेटरी-असोसिएशन ऑफ फिजिकली हॅण्डीकॅप्ड)