टॅकवर उतरून दुसऱया दिशेने चढण्याचा प्रयत्न
बेळगाव / प्रतिनिधी
रेल्वेमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी जीवघेणा प्रकार करीत आहेत. रेल्वे ट्रकवर उतरून रेल्वे येताच दुसऱया बाजूने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा जीवघेणा प्रकार असून यामध्ये एखाद्या प्रवाशाला जबर अपघात होण्याची शक्मयता आहे. रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे येताच टॅकवर उतरणाऱया प्रवाशांचे चित्र बेळगाव रेल्वेस्थानकावर नेहमी दिसते. रेल्वेसोबत पळत जावून लोंबकळत रेल्वे पकडली जाते. एखाद्या वेळेस पाय घसरल्यास थेट रेल्वेखाली येण्याची शक्मयता असते. हे माहिती असतानाही प्रवाशांकडून मात्र असे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे काही प्रवासी जखमीही झाले आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडण्यापूर्वी हे प्रकार थांबविणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रवाशांवर कारवाई करण्याची गरज आहे.