प्रतिनिधी / बेळगाव
फेसबूक फ्रेंन्ड सर्कंलच्या माध्यमातून रेल्वेस्टेशन येथे 100 मास्क व फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसमधील प्रवाशांना मास्क व अन्न पदार्थाचे वाटप झाले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने हे वाटप करण्यात आले.
रेल्वे पोलीस हुबळी विभागाच्या डीवायएसपी पुष्पलता एन. व पीएसआय साताप्पा मुक्कण्णावर, एएसआय नटराज, हेड कॉन्स्टेबल बसवराज बंडिवड्डर, कॉन्स्टेबल मलिक मुल्ला, परडी सरव, संतोष दरेकर, माजी सैनिक व्हीक्टर फ्रांन्सिस, क्वादीम बेपारी, शहाबुद्दीन बॉम्बेवाले, ओमर बेपारी यांच्यासह इतर उपस्थित होते.