मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील प्रकार
चिपळूण
मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना झोपेचा फायदा घेत एका रेल्वे प्रवासी महिलेचे तब्बल साडेचार लाखाचे दागिने अज्ञात चोरटय़ाने लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सुधा सुभाष सावंत (57, अंधेरी पूर्व) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सावंत या 19 जानेवारी रोजी रात्री 7.20 ते 20 जानेवारी दुपारी 2.45 च्या सुमारास मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. यावेळी सावंत या झोपी गेल्या असता त्याचाच फायदा घेऊन चोरटय़ाने 2 लाख रूपये किंमतीचे मंगळसूत्र, 1 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या दोन सोन्याच्या बांगडय़ा व 55 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन असा 4 लाख 35 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. हा प्रकार सावंत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी चिपळूण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरीस
गोवा येथून पनवेलकडे जाण्यासाठी व्ही. एस. जी. पटना एक्स्प्रेसने प्रवास करणाऱया रेल्वे प्रवाशाच्ग्नाा 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना 6 जानेवारीला घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संजय मधुकर जायपाटील (56, बोरडीमालड, मुरुड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जायपाटील हे 5 जानेवारी रोजी थिविम (गोवा) रेल्वे स्टेशनवर पनवेलला जाण्यासाठी व्ही. एस. जी. पटना एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ते 6 जानेवारी रोजी दुपारी 2 वा. चिपळूण रेल्वेस्थानकात आले असता त्यांचा मोबाईल अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेला. या प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.