प्रतिनिधी / मडगाव
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया जामनगर एक्सप्रेसच्या रेल्वे प्रवाशाची अंदाजे 8 लाख रुपये किंमतीचे दागिने आणि अन्य वस्तु असलेली बॅग चोरटय़ांनी लंपास करण्याची घटना मडगावात बुधवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातातील सुरत येथील रोसम्मा नावाची 58 वर्षीय महिला बुधवारी 6 ऑक्टोबर रोजी कन्याकुलमहून सुरत येथे जामनगर एक्सप्रेस रेल्वेतून जात होती. ही रेल्वे मडगाव रेल्वे स्थानकावर पहाटेच्यावेळी पोचली तेव्हा चोरटय़ांनी ही बँग लंपास केली.
या बँगमध्ये सोन्याची साखळी, अंगठी, बांगडय़ा, मोबाईल, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड मिळून सुमारे 8 लाखांचा ऐवज होता.
या चोरीप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 379 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून तपास चालू असल्याची माहिती पोलीस सुत्रानी दिली.