रेल्वे पोलीस स्थानकात एफआयआर : ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव रेल्वे यार्डजवळ अनोळखी युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सुमारे 40 वषीय युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोलीस त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सीआरपीसी कलम 174 (सी) अन्वये संशयास्पद मृत्यू प्रकरण नोंद करण्यात आली आहे. त्या अनोळखी युवकाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आले असून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे यार्डजवळ डेक्कन इस्पितळानजीक हा मृतदेह आढळून आला आहे. 5.5 फुट उंची, काळसर वर्ण, अंगाने सुदृढ असे त्याचे वर्णन आहे. या युवकाने आपल्या अंगावर राखाडी फुल टिशर्ट व काळी हाफ पॅन्ट परिधान केला होता. वरील वर्णनाच्या युवकाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी 0831-2405273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.