प्रतिनिधी/ बेळगाव
येथील रेल्वे स्थानकाला नागनूर रुदाक्षिमठाचे डॉ. शिवबसव स्वामीजींचे नाव द्या, अशी मागणी जिह्यातील मठाधिशांनी केली आहे. गदग येथील तोंटदार्य मठाचे डॉ. सिध्दराम स्वामीजींच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना या संबंधी निवेदन देण्यात आले आहे.
शिवबसवनगर येथील नागनूर रुद्राक्षीमठ येथे झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी कारंजीमठाचे श्री गुरूसिध्द स्वामीजी, निडसोशी मठाचे पंचमशिवलिंगेश्वर स्वामीजी, अथणी मोटगी मठाचे प्रभू चन्नबसव स्वामीजी, नागनूर मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी, कडोलीचे गुरू बसवलिंग स्वामीजी, कित्तूरचे राजयोगेंद्र स्वामीजी यांच्यासह अनेक मठाधिश उपस्थित होते. जिल्हाधिकाऱयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.