प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वे स्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. येथील व्यापारी गाळय़ांचे काम पूर्ण झाले असून बसथांब्याचे शेड उभारण्यासाठी मोठे अँगल दाखल झाले आहेत. अँगल वजनदार असल्याने पेनच्या साहाय्याने शेडची उभारणी करण्यात येणार असून आवश्यक तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे बसथांब्याचे शेड उभारण्याचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्मयता आहे.
शहराच्या दक्षिण भागातील बस या ठिकाणी थांबतात. खानापूर, रामनगर, कारवार, लोंढा, पणजी, गोवा, म्हापसा, दांडेली अशा विविध गावांना जाणाऱया बसदेखील या ठिकाणी थांबतात. त्यामुळे शेकडो नागरिक ये-जा करीत असतात. पण या ठिकाणी असलेल्या बसस्थानकाची दुरवस्था झाली होती. नागरिकांसाठी आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच बसशेडदेखील नव्हते. त्यामुळे प्रवाशांना ऊन-पावसात थांबावे लागत आहे. महत्त्वाचे बसस्थानक असल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रेल्वे स्टेशनसमोरील कारवार बसस्थानकाचा विकास करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करून स्मार्ट बसथांबा निर्माण करण्यात येत आहे. एकाच वेळी दहा बस थांबण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बसस्थानकाच्या सभोवती व्यापारी गाळय़ांची उभारणी करण्यात आली असून हे काम पूर्ण झाले आहे. बसस्थानकाच्या उभारणीचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी फौंडेशनचे काम पूर्ण करून पिलर उभारण्यात आले असून शेडचे काम सुरू करण्यात आले आहे. बसथांबा शेडची उभारणी करण्यासाठी मोठमोठय़ा आकाराच्या अँगलचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ प्रवाशांसाठी पत्र्याचे शेड होते. पण आता हा बसथांबा वेगळय़ा स्वरुपात दिसणार आहे. आकर्षक आणि भव्य अशा बसथांब्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शेड उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून लवकरच हे बसस्थानक नव्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे.