ऑनलाईन टीम / गोवा
आज रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे प्रतिनिधीत्व करणारे शशीराज नाईक शिरोडकर यांनी ३१-मडगाव मतदारसंघासाठी मडगाव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. नव्याने स्थापन झालेल्या रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे माडगावचे उमेदवार शशीराज शिरोडकर प्रथमच निवडणूक लढवत आहेत. शशीराज म्हणाले ”राजकारण हा घाणेरडा खेळ आहे. असे आपण म्हणतो आणि तो स्वच्छ करण्यासाठी कोणीतरी पुढे आले पाहिजे असे मला वाटते.
मडगाव हे अवैध स्थलांतरितांनी कसे भरले आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि येथील आमदार त्यांच्या मतांच्या आधारे गेली २६ वर्षे कार्यरित आहेत. हे आमदार फक्त स्वतःच्या संपत्तीची वाढ करतात आणि विकासाचा नावाखाली जनतेची फसवणूक करतात. निवडणुकीच्या काही महिने आधी आम्हाला फक्त डांबराचा वास घ्यायला मिळतो आणि पुढील संपूर्ण कार्यकाळासाठी आमदारांना पैशाचा वास घ्यायला मिळतो. हे बदलावे लागेल.
मडगावमध्ये खराखुरा विकास न होता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता मडगावकर त्यांचे भविष्य व विकास गोव्याच्या हितासाठी मतदान करून घडवू शकतात.RGP ची विचारधारा आणि धोरणे १००% गोव्याला लाभदायक ठरतील असे ही ते यावेळी म्हणाले.