बेंगळूर : रेशनअंतर्गत बीपीएल रेशनकार्डधारकांना यापुढे चांगल्या प्रतीचे आणि पौष्टिक तांदूळ वितरण करण्यास राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. कुपोषण दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.
प्रथिने, लोह आणि इतर पौष्टिक घटकांचा समावेश असणाऱया तांदळाचे वितरण करण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर यादगीर किंवा तुमकूर जिल्हय़ात जारी होणार आहे. यासंबंधी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री के. गोपालय्या लवकरच खात्यातील अधिकाऱयांशी चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी 174.6 कोटी रुपये अनुदान राखून ठेवण्यात आले आहे. प्रायोगिक टप्प्यात योजना यशस्वी झाल्यानंतर राज्यातील 15 जिल्हय़ांमध्ये सरकार टप्प्याटप्प्याने ही योजना राबविणार आहे.