मतदान ओळखपत्राचे करायचे काय अनेकांसमोर प्रश्नच
प्रतिनिधी / दापोली
ग्रामपंचायतीच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. असे असताना या निवडणूकीसाठी ओळखीचा पुरावा दाखविण्यासाठी रेशनकार्ड मतदान केंद्रावर चालणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मग मतदान ओळखपत्रे फक्त नावापुरतीच ठेवायची काय ? अशी चर्चा रंगत असून रेशनकार्ड हा ओळखीचा पुरावा दाखविण्यासाठी मतदान केंद्रावर कसे काय चालणार अशा संभ्रमावस्थेत अनेक नागरीक पडले आहेत.
या ग्रा. पं. निवडणूकीच्या वेळी ओळख दाखवणारा पुरावा म्हणून विना फोटोचा रेशनकार्ड चालणार असेल तर शासन नवं मतदारांना मतदान कार्ड का वाटप करत आहे. नवीन मतदार कार्ड बनवण्यावर खर्च का केला जात आहे. असा प्रश्न आता जनसामान्य जनतेतून विचारला जात आहे. त्यामुळे रेशनकार्ड हे मतदान केंद्रावर ओळखपत्र म्हणून किती योग्य आहे. याचा विचार प्रशासनाने करावा प्रतिक्रीया नागरीकांनी व्यक्त केली. याबाबत दापोलीच्या तहसिलदार यांच्याकडे संपर्क केला असता संपर्क झाला नाही.