वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी ‘मेरा रेशन’ नावाने मोबाईल ऍप सादर केले आहे. या ऍपमध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबांच्या लोकांना नजीकच्या रास्त दरातील धान्य दुकानासह रेशनकार्डची स्थिती आणि रेशनकार्डधारकांना मिळणाऱया सुविधांची पूर्ण माहिती मिळणार आहे. मेरा रेशन मोबाईल ऍपला ऍण्ड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी सादर करण्यात आले आहे. अशा स्थितीत वापरकर्ते याला गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.
वन नेशन-वन रेशनकार्ड पुढाकाराच्या दिशेने पाऊल टाकत ‘मेरा रेशन’ मोबाईल ऍप सादर करण्यात आला आहे. रेशनकार्ड धारक स्वतःचे घर बदलून नव्या ठिकाणी जात असल्यास तेथेही तो मोबाईलद्वारे रास्त दराचे धान्य दुकान नजीक कुठे आहे आणि तेथे कुठल्या सुविधा दिल्या जात आहेत हे पाहू शकतो. शासकीय आकडेवारीनुसार देशभरात 69 कोटी लोक नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्टचा (एनएफएसए) लाभ घेत असून यात त्यांना अनेक सुविधा मिळत आहेत.
14 भाषांमध्ये उपलब्ध होणार
एनएफएसएद्वारे रेशनकार्ड धारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे केवळ 1 पासून 3 रुपये प्रति किलोग्रॅमच्या हिशेबाने धान्य मिळते. ही सुविधा 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जनता प्राप्त करत आहे. आता मेरा रेशन ऍपद्वारे या लोकांना अधिक सुलभपणे सुविधा मिळणार आहे. सध्या या ऍपमध्ये हिंदी आणि इंग्रजीत माहिती देण्यात आली आहे, पण लवकरच यात 14 प्रमुख भाषा उपलब्ध करविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भाषांच्या माध्यमातून देशभरातील प्रमुख हिस्स्यांमध्ये रेशनकार्ड आणि त्यावर मिळणाऱया लाभांविषयी पूर्णपणे माहिती प्राप्त करता येणार आहे.
सहज वापर करता येणार
मेरा रेशन मोबाईल ऍपचा वापर अत्यंत सोप्या प्रकारे करता येणे शक्य आहे. सर्व प्रथम हा ऍप डाउनलोड केला जावा. गूगल प्ले स्टोअरवर हा ऍप उपलब्ध आहे. डाउनलोड केल्यावर यात स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदवावा लागतो. नोंदणीकृत झाल्यावर यात स्वतःच्या रेशनकार्डचा क्रमांक नमूद करावा लागेल. त्यानंतर रेशनकार्डशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. मेरा रेशन ऍपवर धान्य वितरणापासून मागील 6 महिन्यांमधील व्यवहार आणि आधार सीडिंगची माहिती मिळणार आहे.