वार्ताहर/ कास
कोरोनाने जगभर थैमान घातल्याने दिड महिन्यापासुन देश लॉकडाऊन झाला असुन लोकांना सोशल डीटस्टींग चे पालन करत घरातच राहण्याचे आदेश असताना पावशेवाडी ता. जावली येथील रेशनींगच्या नावाखाली दुकानामध्ये एकच गर्दी होत असुन नियमांची पायमल्ली करत कोरोनाला निमंत्रीत केले जात तर नाही ना अशी चर्चा भागात रंगु लागली आहे
बामणोली विभागातील बावीस गावासाठी पावशेवाडी येथे एकच रेशनींगचे दुकान असुन सदर दुकानामध्ये रेशनींगसाठी विभागातील नागरीग एकाच दिवशी मोठमोठय़ा गाडया टेम्पो कार मिनी ट्राव्हलर आदी वाहने घेऊन दाखल होत असुन त्या ठिकाणी सोशल डिटस्टींगच्या आतंराचा फज्जा उडाला आहे अनेक गावातील मुंबईसह शहरातुन आलेले नागरीक एकाच वेळी एकाच ठिकाणी येत असल्याने कोणालाच कोरोना आजाराचे गांभीर्य राहिले नसल्याचे दिसुन येत आहे
सदर रेशनींग दुकानदार एकाच दिवशी अनेक गावांतील नागरीकांना रेशनींग साठी बोलवत असल्याने गर्दी होवुन बामणोली बाजारपेठेतही गर्दी होत असुन ग्रामस्तरीय समीती कींवा ग्रामपंचायतीचा कोणताच धाक राहिला नसुन कोणतेही नियोजन पहायला मिळत नाही कोरोना जावलीतल्या बामणोली विभागाच्या वेशीवर असणाया निझरे व माह्ते मुरा गावात दाखल होत त्याचा प्रसार होवुनही अजुन काही नारीकांना त्यांचा गंभीर्य नसल्याचे दिसुन येत असल्याने आपल्याच घरात आपल्याला स्वतांहुन होमकॉरंटाईन करून घेतलेल्या व नियमांचे पालन करणाया नागरीकांमधुन संताप व्यक्त होत आहे