प्राथमिक शिक्षक संघटनेचे मुख्यमंत्र्यांनी पत्र
प्रतिनिधी / पेडणे
कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॕकडाऊन काळात अलिकडेच शिक्षकांना आरोग्य सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते.ते काम संपल्यानंतर आता परत नव्याने या शिक्षकांना रेशन दुकानांमध्ये धान्य वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी 27 एप्रिल ते 12 मे पर्यंत डय़ुटी वर जाण्याचा आदेश दिला आहे.या निर्णयामुळे शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आणि यापुढे कोणती कामे शिक्षकांना सरकार देणार असा प्रश्न विचारला आहे. गोवा राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यमंञी डाॕ.प्रमोद सावंत यांना पञ लिहून या डय़ुटी संबधी विचार करुन अडचणी दूर करण्याची मागणी केली आहे.
सराकारच्या रेशन दुकानावर शिक्षकांना घालण्यात आलेल्या डय़ुटी संबंधात सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू आहे. काही शिक्षकांनी सरकारच्या या धोरणावर जाहीर टीका केली आहे.
गोवा राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश गावकर व सरचिटणीस संभाजी राऊत यांनी मुख्यमंञी डाॕ.प्रमोद सावंत यांना दि.27 एप्रिल रोजी पञ देऊन सरकारने दि.27 एप्रिल पासून शिक्षकांना शिधा वाटप कामासंबंधी येणाऱया अडचणी मांडल्या आहेत. यात विद्यार्थ्यांचे आंतिम निकालपञ , लिव्हिंग प्रमाणपञ व शाळेतील इतर कामे करणे शिल्लक असल्याचे म्हटले आहे. गोव्यातील विविध भागात बसेचची सोय नसताना ब-याच शिक्षकांना 10 ते 15 किलोमीटर अंतरावर सरकारने काम दिले आहे. अनेक ठिकाणी रेशन धान्य वितरण दुकानात प्रसाधनाची सोय नसल्याने शिक्षकांची गैरसोय होण्याची शक्मयता आहे. ज्या शिक्षिका गरोदर, स्तपान करणाऱया माता – भगिनी व 50 वर्षे वयोगटावरील आहेत अशा शिक्षिकांना या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रेशन धान्य कामादरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल देण्यासंबधी शंका आहे.अशा आशयाचे पञ गोवा राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यमंञी यांना देऊन शिक्षकांना भेडसावणा-या विविध समस्यांवर विचार करुन अडचणी दूर करण्याची मागणी केली आहे.
रेशन धान्य दुकानदारावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने शिक्षकांना नेमण्यात आलेल्या रेशन दुकान डय़ुटीमुळे विद्यार्थ्यांच्या निकालाचा बट्टय़ाबोळ होणार असल्याची चर्चा असून सरकारच्या या निर्णयाची अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.