कारिवडे/प्रतिनिधि-
रेशन धान्य दुकानाचा कायमस्वरूपी परवाना कारिवडे गावाला मिळण्याबाबत सहा वर्षापूर्वी ग्रामसभेत ठराव करून याबात प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत सहा वर्षे पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
त्यामुळे येत्या आठ दिवसात याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास संबंधित प्रशासनाच्या उदासीन व वेळकाढू धोरणाबाबत मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण छेडण्याचा इशाराकारिवडेवासियांनी सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, कारिवडे सरपंच अपर्णा तळवणेकर, उपसरपंच तानाजी साईल, सामाजिक कार्यकर्ते आनंद तळवणेकर उपस्थित होते