प्रतिनिधी/ कोल्हापूर
दै.तरुण भारतचे छायाचित्रकार इम्रान गवंडी यांचे पुत्र रेहान गवंडी यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अपेंडिक्सची गुंतगुतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.आतापर्यंत त्यांना मोठय़ा प्रमाणात वैद्यकीय खर्च आला आहे.त्यांच्यावर अजून उपचार होणार असून सुमारे एक लाखाहून खर्च येण्याची शक्यता आहे.छायाचित्रकार गवंडी आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांना हा खर्च परवडणारा नाही.यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्थांनी पुढे येवून मदत करावी असे आवाहन समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि गवंडी कुटुंबियांनी केले आहे.
समाजात घडणाऱया घटनांचे प्रतिबिंब वर्तमानपत्रासह विविध प्रसारमाध्यमातून प्रसिध्द होते.पत्रकार,छायाचित्रकार वेळेचे भान न ठेवता स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत वार्तांकन करत असतात.स्वत:च्या कुटुंबाकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. आपल्या लेखणी आणि छायाचित्रातून समस्यावर प्रकाश टाकूनसमाजातील दुर्बल घटकांना न्याय मदत मिळवून देण्याचे काम पत्रकार,छायाचित्रकार करतात. त्यामुळे एखाद्या पत्रकार,छायाचित्रकारावर किंवा त्याच्या कुटुंबावर अशी वेळ आल्यास समाजातील दानशूर व्यक्ती,संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करण्याची गरज आहे. अशी परिस्थिती इम्रान गवंडी यांच्या कुटुंबियावर आली आहे. त्यांचा मुलगा रेहान इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे.काही महिन्यापूर्वी त्याला अपेडिंक्स झाल्याचे निदान झाले.सोनोग्राफी केल्यावर त्याच्या आतडय़ाला इन्फेक्शन झाल्याचे कळाले.त्यावेळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.यानंतर काही दिवस त्याला बरे वाटले.मात्र पुन्हा त्याला त्रास होऊ लागला.यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याच्यावर गुंतगुतीची शस्त्रक्रिया करण्यात आली असुन आतापर्यंत 35 हजार रुपये खर्च आला आहे. पुढील उपचारासाठी एक लाखाहून अधिक खर्च येणार आहे. हा खर्च गवंडी यांना झेपणारा नाही. यामुळे समाजहित डोळयासमोर ठेवून उदात्त भावनेने छायाचित्रकार म्हणून सामाजिक बांधिलकी जपणाऱया इम्रान गवंडी यांच्या मुलाच्या उपचारासाठी समाजातील दानशुर व्यक्तींची सढळ हस्ते मदतीची गरज आहे. ज्यांना मदत करायची आहे त्यांनी इम्रान गवंडी यांच्या बँक अकाऊंट क्र.389410800040 यावर जमा करावी असे आवाहन समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि गवंडी कुटुंबियांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी महेश गावडे 9823767858 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.