प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील परप्रांतीय कर्मचाऱ्यांना रॉबिनहूड आर्मी गोकुळ शिरगाव समाजसेवकांची मदत करण्यात आली.
गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसराती काम बंद असल्याने माधवनगरमध्ये एका बिल्डिंगमध्ये जवळपास पंचवीस ते तीस परप्रांतीय कर्मचारी येथे बसून होते. या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन दिवसापासून अन्नधान्याची सोय नसल्याने ते अडचणीत होते. या लोकांच्या समस्या जेव्हा रॉबिनहूड अर्मी गोकुळ शिरगाव येथील समाजसेवकांना समजल्या त्यांनी ताबडतोब या सर्वांच्यासाठी आठ दिवस पुरेल इतके तांदूळ, तेल आणि जेवणाचे साहित्य पोच केले. यावेळी सर्व परप्रांतीय कर्मचारी यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते आणि हे साहित्य मिळाल्यानंतर या परप्रांतीयांच्यामध्ये चेहर्यावर एक नवीनच उमेद पाहायला मिळत होती.