मुंबई
दमदार बाईकमध्ये नाव कमावणाऱया रॉयल इनफिल्डने महिला बाईक चालकांकरीता खास पेहराव बाजारात विक्रीसाठी आणला आहे. पहिल्यांदाच अशी योजना रॉयल इनफिल्डने राबवली आहे. 700 ते 14 हजार रुपये किंमतीत पेहरावाचा सेट कंपनीने आणला असून त्यात जॅकेट, हेल्मेट व इतर ऍक्सेसरीज असतील. विपेत्यांकडे याची खरेदी केली जाऊ शकते किंवा इच्छुक महिला चालकांना वेबसाईटवर संपर्क करून खरेदी करता येईल.