नवी दिल्ली
दमदार, स्टायलिश मोटारसायकल्समध्ये दबदबा निर्माण करणाऱया रॉयल इनफिल्डने आपली नवी हिमालयन मोटारसायकल बाजारात सादर केली आहे. सदरच्या गाडीची (एक्स शोरूम दिल्ली) किंमत 2 लाख रुपये इतकी असणार आहे. सदरची सुधारीत आवृत्तीची गाडी भारतासह युरोप आणि इंग्लंडमध्ये दाखल केली आहे. 411 सीसीची ही बाईक टर्न बाय टर्न नेव्हीगेशन पॉडच्या सुविधेसह आहे. जागतिक प्रवासासाठी उपयुक्त ठरावी अशी ख्याती या गाडीने गेल्या 5 वर्षात कमावली आहे. भारतासह इतर देशात या कंपनीचे चाहते मोठय़ा संख्येने पसरलेले आहेत. सुरूवातीला 2016 मध्ये ही गाडी पहिल्यांदा विकसित करण्यात आली.