सप्टेंबरमध्ये 55 हजार 858 वाहनांची विक्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आरामदायी मोटारसायकलच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणाऱया रॉयल इनफिल्डच्या सप्टेंबरमधील वाहन विक्रीत नाममात्र 1 टक्के इतकी वाढ झाली आहे. कंपनीने स्थानिक बाजारात 55 हजार 910 वाहनांची विक्री केली आहे. याच तुलनेत मागच्या वषी सप्टेंबरमध्ये 54 हजार 858 वाहनांची विक्री झाल्याची नोंद आहे तर सप्टेंबरमध्ये कंपनीची एकूण वाहन विक्री 1 टक्के वाढून 60 हजार 041 इतकी झाली आहे. मागच्या वषी विक्री समान कालावधीत 59 हजार 500 इतकी होती. कंपनीने सप्टेंबरमध्ये 4 हजार 131 वाहनांची निर्यात केली आहे, जी मागच्या वषीच्या तुलनेमध्ये 11 टक्के इतकी घटली आहे.