नवी दिल्ली
रॉयल इनफिल्डने येणाऱया 7 वर्षात आपला बाजारातील हिस्सा अधिक मजबूत करण्याचा विचार चालवला आहे. येणाऱया 7 वर्षात कंपनीने 28 नव्या गाडय़ा सादर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक तिमाहीत एक नवी गाडी सादर करणार आहे. भारतासह विदेशातील बाजारावर कंपनी आपले लक्ष्य अधिक केंद्रित करणार आहे. पुढच्या 6 ते 12 महिन्यात कंपनी थायलंडमध्ये असेम्बली युनिट सुरू करण्याची योजना बनवत आहे. यासोबत ब्राझीलमध्येही असेम्बली युनिट टाकण्याचा विचार केला जात आहे.