प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील साळवीस्टॉप येथील ओमराधा अर्पाटमेंटमधील ‘रॉयल कॉर्नर’ या स्वीट मार्टला मंगळवार मध्यरात्रीच्या 2 च्या सुमारास आग लागल़ी या आगीमध्ये दुकानातील माल जळून खाक झाला असून सुमारे 12 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉट सर्किटने ही आग लागली असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल कॉर्नरचे मालक सुरेश नायर हे मंगळवारी रात्री दुकानातील सर्व कामे आटपून दुकान बंद करुन गेल होत़े मध्यरात्रीच्या सुमारास स्वीट मार्टमध्ये शॉक सर्किट होवून दुकानातील फर्निचर, विद्यृत उपकरणे आदींनी पेट घेतल़ा दुकानाला आग लागल्याचे अर्पाटमेंट मधील रहिवाशांच्या लक्षात आल़े गस्तीवरील पोलीसांना आगीबाबतची माहिता देण्यात आली.
पोलीसांनी तत्काळ नगर परीषदेच्या अग्नीशमन विभागाला पाचारण करण्यात आल़े नगर परीषदेच्या अग्नीशमन बंबाने तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आह़े घटनास्थळाचा पोलीसांनी उशीरा पंचनामा केला असून याबद्दल अधिक तपास शहर पोलीस करत आहेत़