नवी दिल्ली
नोकर भरती किंवा रोजगाराचे प्रमाण नोव्हेंबरमध्ये घटले असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबरमध्ये भरतीचे प्रमाण 0.9 टक्के इतके घटले आहे. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण 0.1 टक्के इतके घटलेले होते. परिस्थिती पूर्वपदावर येतेय असे जरी म्हटले जात असले तरी नोकर भरतीत सलग दुसऱया महिन्यात झालेली घट चिंताजनक आहे. 35 लाख जण बेरोजगार राहिले असल्याचेही सांगण्यात आले आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये 393 दशलक्ष लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. नोव्हेंबर 2019ची तुलना करता हे प्रमाण 2.4 टक्के इतके कमी आहे.