प्रतिनिधी / जत
राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना समितीच्या सदस्यपदी आ विक्रमसिंह सावंत यांची निवड करण्यात आली आहे, तसेच ग्रंथालय समितीवर ही त्यांना घेण्यात आले आहे.
राज्य सरकारने नुकत्याच विविध समित्यांची स्थापना केली आहे. या समितीवर विधानसभा सदस्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. जत मतदार संघाचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना रोजगार हमी व ग्रंथालय समितीवर घेण्यात आले आहे. रोजगार हमी समिती जत तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.