प्रतिनिधी/ बेळगाव
जीएसएस कॉलेजचा विद्यार्थी शशांक लक्ष्मीनारायण शानभाग याने 589 (98.16) गुण मिळविले आहेत. सध्या बेळगाव विभागात सर्वाधिक गुण घेणारा विद्यार्थी तो ठरला आहे. शशांकने केवळ दररोज 4 ते 5 तास अभ्यास करून हे यश मिळविले आहे. पुढे इंजिनियरिंग करण्याचा त्याची इच्छा असल्याचे त्याने तरुण भारतशी बोलताना सांगितले.
कोरोनामुळे परीक्षा देताना थोडे दडपण येत होते. दोन महिन्यानंतर इंग्रजीचा पेपर द्यावा लागला होता. परंतु शेवटच्या दहा दिवसांमध्ये तयारी केली आणि त्यांने चांगले गुण मिळविले आहेत. शशांकचे वडिल हे हिंडाल्को कंपनीमध्ये इंजिनियर म्हणुन सेवा बजावित आहेत. वडिल लक्ष्मीनारायण व आई सीमा यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्याचे त्याने सांगितले.
बारावीचा अभ्यास करताना कोणत्याही एका विषयावर लक्ष केंद्रीत न करता सर्वच विषयांचा अभ्यास व त्याचा सराव केल्यास चांगले यश मिळू शकते. असे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी घेतलेली मेहनत व कुटुंबियांनी दिलेली साथ त्यामुळेच मला हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.