प्रतिनिधी / खेड
सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या इंटरनेशनल मॅथ्स ऑलिम्पियाड परीक्षेत भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमधील इ. २ रीतील शौर्य गावस याला सुवर्णपदक प्राप्त झाले. सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. शैलेश देवळेकर, स्वप्निल पंडित, श्रृती दिंडे, योगेश वीर, मृणाल म्हापदी, राहुल चव्हाण, अनंत बागडे, प्रितम वडके, दीपा मेश्राम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था चेअरमन बिपीन पाटणे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. अजित भोसले, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.