प्रतिनिधी /बेळगाव
समाजातील इतर सर्व घटकांना घडविण्यासाठी समाजाची घडी सुरळीत बसविण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकाची गरज आहे. एखाद्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षकाशिवाय पर्याय नाही असे उद्गार रोटरी रोटरीचे उप प्रांतपाल विक्रम जैन यांनी काढले.
रोटरी ई क्लब तर्फे देण्यात येणाऱया नेशन बिल्डर पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापिठाचे रजिस्ट्रार ए. एस. देशपांडे उपस्थित होते. त्यांनीही समाजातील शिक्षकाची भुमिका या विषयावर मार्गदर्शन केले. प्रति वर्षाप्रमाणे यावषीही क्लबतर्फे विशेष कार्य करणाऱया 6 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सतिश पाटील, मोहन पाटील, मारूती देवकरी, रूपा पाटील, विनायक कुंभार, महेश हेब्बाळकर या शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून महिला विद्यालय हायस्कूलमधील जुन्या शिलाई मशीन विवेक कुलकर्णी यांनी दुरूस्ती करून गरीब व होतकरू महिलांना देण्यात आल्या. प्राध्यापक आनंद गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. अनंत नाडगौडा यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सचिव सुर्या कुलकर्णी यांनी आभार मानले. प्रा. प्रवीण पाटील व प्रतिज्ञा राचनैकर यांनी सूत्रसंचालन केले.