प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावतर्फे समाजातील 15 गरजू महिलांना ‘सुई धागा’ योजनेंतर्गत मोफत शिलाई मशीन वितरण करण्यात आल्या. गोमटेश विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. रोटरीचे अध्यक्ष प्रा. अशोक काडापुरे यांनी स्वागत केले.
यावेळी संजय पाटील म्हणाले, लाभार्थी महिलांनी या शिलाई मशीनचा योग्य तो उपयोग करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. अशोक काडापुरे असिस्टंट गव्हर्नर रोटे. अजय हेडा, क्लबचे सदस्य हेमेंद्र, अरविंद, नितीन चौगुले, सोमनाथ, सचिन कुलगोड, डी. बी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक चेअरमन सुनील तडानी व अशोक कटारिया यांनी परिश्रम घेतले.