मिताली चव्हाण प्रथम तर द्वितीय स्नेहल तळेकर.
तळेरे / वार्ताहर–
रोटरी क्लब, कणकवली आयोजित कै. विष्णू शंकर पडते स्मृती वक्तृत्व स्पर्धा २०२२ नुकतीच कणकवली येथे पार पडली. यामध्ये ११ ते पदवी या महाविद्यालयीन गटातून वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले .
महाविद्यालयीन गटातून मिताली गोपाळ चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला, स्नेहल संतोष तळेकर हिने द्वितीय क्रमांक तर उत्तेजनार्थ विराज संजय नांदलस्कर याने मिळवत महाविद्यालयीन गटामध्ये तळेरे महाविद्यालयाचे वर्चस्व प्रस्थापित केले. प्राध्यापिका एस.एन्.जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.यावेळी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका पी.एम. पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले.