प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगावला बेस्ट क्लब ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणून विविध बारा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. हुबळीच्या हॉटेल क्मयुबिक्स येथे झालेल्या कार्यक्रमात प्रांतपाल डॉ. गिरीश मसुरकर यांच्या हस्ते क्लबला हे पुरस्कार देण्यात आले. क्लबचे अध्यक्ष जीवन खटाव यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. विशेष म्हणजे पूर आणि कोविड परिस्थितीमध्ये क्लबने केलेल्या कार्याची दखल म्हणून हे पुरस्कार देण्यात आले.
2019-20 मध्ये क्लबने बिम्सला 7 व्हेंटिलेटर्स व टेस्टिंग मशीन दिले. निलावडे येथे पुरामुळे कोसळलेल्या शाळेचे पुनर्बांधकाम करून दिले. शिवाय पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य दिले. यासाठी बेस्ट क्लब, बेस्ट प्रेसिडेन्ट जीवन खटाव, बेस्ट सेपेटरी प्रमोद अगरवाल, टीआरएफ संकलन सचिन सबनीस, बेस्ट इन पोलिओ फंड, लीटरसी प्रमोशन, कम्युनिटी सर्व्हिस, क्लब सर्व्हिस, ग्लोबल ग्रान्ट व इंटरनॅशनल सर्व्हिस या सेवांसाठी एकूण बारा पुरस्कार देण्यात आले. याच कार्यक्रमात रोटेरियन शरद पै यांना ‘सायटेशन फॉर मेरिटोरियस सर्व्हिस’ सन्मानाने गौरविण्यात आले.