प्रतिनिधी /बेळगाव
गणाधीश मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्यावतीने सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. अशोक नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाला माजी प्रांतपाल रोटे. अविनाश पोतदार आणि नियोजित प्रांतपाल रोटे. वेंकटेश देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी केएलई इंटरनॅशनल स्कूलच्या दीप्ती इंगळे, केएलएस इंग्लीश मीडियम हायस्कूलच्या नंदिनी कुलकर्णी, स्वाध्याय विद्या मंदिरच्या हेमलता कुलकर्णी, सरकारी सरदार्स हायस्कूलचे रणजित चौगुले यांचा सत्कार वेंकटेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सोनी टीव्ही आयोजित ‘डान्स इंडिया चॅप्टर 4’मधील उपविजेता पृथ्वीराज केंगारी व ज्यू aquetic स्वीमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल वेदांत मिसाळे आणि अद्वैत दळवी तसेच आशुतोष हिरेमठ याने बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाकडून क्रिकेट खेळताना राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत शतक ठोकून आपल्या फलंदाजीची चमक दाखवून उत्कृष्ट फलंदाज तसेच ‘मॅन ऑफ द मॅच’ हा किताब पटकावल्याबद्दल माजी प्रांतपाल रोटे. अविनाश पोतदार यांच्या हस्ते सर्व होतकरू तरुण मुलांचा सत्कार करण्यात अला. सत्काराला उत्तर देताना सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर अविनाश पोतदार व व्यंकटेश देशपांडे यांनीही आपले विचार मांडले. क्लबचे सेपेटरी संतोष हत्तरकी यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.