प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्यावतीने रुग्णवाहिका भेट देण्यात आली. अनगोळ येथील लाईफलाईन हॉस्पिटलला ही रुग्णवाहिका देण्यात आली. रोटरीचे प्रांतपाल गौरीश धोंड यांच्या हस्ते रुग्णवाहिकेच्या चाव्या डॉ. संजीव नाईक व डॉ. शैलेंद्र कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
सदर रुग्णवाहिका घेण्यासाठी अमेरिका येथील वीरशैव समाज दल आणि जेएसएस फौंडेशन म्हैसूर व लाईफलाईन हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला रोटे. प्रतिभा धोंड, रोटरी क्लब ऑफ साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक, सेपेटरी संतोष हत्तरकी, सदस्य बबन देशपांडे, आनंद कुलकर्णी, नागराज नाशी, सतीश कुलकर्णी, रमेश रामगुरवाडी, संजीव नाईक, उदय जोशी, नितीन कुलकर्णी, विनय बेहरे यासह इतर उपस्थित होते.