वार्ताहर /माशेल :
कोरोना महामारी काळात दिवसरात्र जीवाची तमा न बाळगता वावरणाऱय़ा डॉक्टर्स, पारिचारीका, पोलीस विविध कार्यालयाच्या अधिकाऱयांना रोटरी क्लब ऑफ मिरामार संस्थेतर्फे सेनिटायझेशन किट प्रदान करण्यात आला. माशेल पोलीस आऊटपोस्ट, विद्युत खात्याच्या कार्यालयीन अधिकारी व लाईनमॅनसाठी सेनिटायझर व मास्क नुकतेच देण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ मिरामारचे अध्यक्ष कमलेश अमलानी, उपाध्यक्ष शांतोदू मोहिते, शैलेश शेटय़े तसेच माशेल आऊटपोस्टचे विनोद कुमार साळूंके, विद्युत खात्याचे अभियंते निळकंठ सावंत व इतर लाईनमन उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलेश अमलानी यांच्याहस्ते सर्वांना सेनिटायझर व मास्क प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना अमलानी म्हणाले की डॉक्टर, पोलीस नर्स व इतर कामगार कोरोनाच्या महामारीत दिवस रात्र लोकांची सेवा करीत आहे. खरोखरोच ते कौतुकास पात्र आहेत. रोटरी क्लब ऑफ मिरामार जनसेवेसाठी कार्यरत असून लोकांची सेवा हेच आमचे ध्येय आहे.
कोरोना वॉरिअर्सना सन्मानित केल्याबद्दल निळकंठ सावंत यांनी आभार मानले.