बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि डॉ. प्रकाश रायकर फौंडेशनतर्फे महिलांसाठी तिळगूळ समारंभ, वाघवडे मार्गावरील माधवाचार्य फार्महाऊसवर झाला. जयश्री अशोक काडापुरे यांनी प्रास्ताविक करून सर्व महिलांना संक्रांतीचे वाण दिले. यावेळी रायकर फौंडेशनतर्फे तबलावादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष अशोक काडापुरे, सचिव डॉ. जगत्शंकरगौडा यांच्यासह सीमा हुबळी, प्रतिभा राजमाने, वनिजा पाटील, सुधा पाटील, संगीता अनगोळकर, अश्विनी कट्टी, सौम्या तळेगाव, शीतल पाटील, संगीता कटारिया यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या.
Previous Articleकोरोना योद्धय़ांना अनगोळमध्ये लसीकरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.