प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचा 32 वा वर्धापनदिन सोमवार दि. 14 रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रांतपाल गौरीश धोंड व प्रतिमा धोंड उपस्थित राहणार आहेत.
रोटरी क्लबचे अध्यक्ष अशोक नाईक व सेपेटरी संतोष हत्तरकी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ महिन्यांत विविध उपक्रम राबविले आहेत. प्रामुख्याने आरोग्य तपासणी शिबिर, मुलींसाठी एमएचएम कार्यक्रम, मोफत नेत्रचिकित्सा, नेत्रतपासणी असे अनेक उपक्रम राबविले आहेत. आजतागायत 675 नागरिकांच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एकूण 1500 शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट क्लबने ठेवले आहे. यासाठी एनएबी हॉस्पिटल मिरज व डॉ. माधुरी दीक्षित यांचे सहकार्य लाभले आहे. या शस्त्रक्रियांना लागणारा निधी जमा करण्यासाठी प्रकाश बडकुंद्री यांचे सहकार्य मिळाले.
जाफरवाडी येथील उच्च प्राथमिक शाळेला 20 डेस्क दिले जाणार आहेत तर टॉयलेट ब्लॉकचे काम सुरू आहे. कल्लेहोळ येथील शाळेला 20 डेस्क देण्यात येणार आहेत. अनगोळ येथील लाईफलाईन हॉस्पिटलला रुग्णवाहिका देण्यात आली. मुलींना आतापर्यंत 3 हजार सॅनिटायझर नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले आहे. एकूण 5 हजार नॅपकिनचे वाटप केले जाणार आहे. 1 हजार नागरिकांना मोफत कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. दीडशे बाटल्या रक्तदान व व्हीटीयू परिसरात 250 रोपे लावण्यात आली. बालिका आदर्श हायस्कूलला प्रोजेक्टर तर स्वाध्याय विद्या मंदिरच्या 12 गरीब मुलींची फी भरण्यात आली.
शहरातील 20 भाजी विपेत्यांना चार चाकी हातगाडय़ांचे वितरण केले जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये बी. के. मॉडेल हायस्कूल येथे शौचालय बांधण्यात येणार आहे. 50 लाख रुपये खर्चून गरीब महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. माहेश्वरी अंध शाळेला 14 लाख रुपये खर्चून साहित्य दिले जाणार आहे, अशी माहिती यावेळी क्लबतर्फे देण्यात आली.