वृत्तसंस्था/ लिस्बन
पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी पोर्तुगाल संघाच्या शिबिरातून बाहेर पडला आहे. तो वैयक्तिक खासगी विमानाने उत्तर इटलीमध्ये गेला असल्याचे स्थानिक मीडियाने वृत्त दिले आहे.
रोनाल्डोला कोरोनाची लागण झाल्याचे पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनने मंगळवारी जाहीर केले होते. रविवारी पोर्तुगाल व फ्रान्स यांच्यात झालेला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. त्यानंतर सोमवारी तो पॉझिटिव्ह आढळला होता. तो आता बुधवारी स्वीडनविरुद्ध होणाऱया युफा नेशन्स लीगमधील सामन्यात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 35 वर्षीय रोनाल्डोला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला संघाच्या ट्रेनिंग सेंटरपासून आयसोलशनमध्ये ठेवण्यात आले होते. गेल्या आठवडय़ातही पोर्तुगालचे आणखी दोन खेळाडू कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते.