प्रतिनिधी /पेडणे
रोबोटिक्स आणि कोडी?ग हा संगणकीय ज्ञानाचा अध्यावत अभ्यासक्रम इयत्ता सहावी, सातवी व आठवी मध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमात लागू करण्या संदर्भात पालक तसेच शिक्षण संस्था चालकांना माहिती देण्यासाठी पेडणे येथे जागृती कार्यशाळा संपन्न झाली.
शालेय शिक्षण खाते व तंत्रज्ञान शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे प्रकल्प संचालक डॉ. विजय बोर्गेस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यांना तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे शिक्षण अधिकारी देवेंद्र कुवेलकर यांनी सहाय्य केले.
श्री बोर्गेस उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, करोना महामारी काळात मुलांच्या शालेय शिक्षणात संगणकाचे, तसेच स्मार्ट फोन सारख्या डिजीटल उपकरणांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. डिजीटल युगात मुले मागे राहून चालणार नाही. काळाबरोबर बदल आवश्यक असून त्यासाठी, कोडी?ग अँड रोबोटिक्स हा विषय मुलांना सखोलपणे समजने आवश्यक आहे कारण हा विषय मुलांना त्यांची तार्किक विचार व त्यांची तर्कशक्ती वाढविण्यास मदत होणार आहे.शाळा बाह्य वेळेत हा अभ्यासक्रम शिकवला जाणार असल्याने, शाळा प्रमुख, शिक्षण संस्था चालक, पालक यांचे सहकार्य महत्वाचे आहे.
शिक्षण संस्था प्रमुख म्हणून हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही पेडणे तालुक्मयातील इतर संस्था चालक, मुख्याध्यापक,पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, शिक्षक यांच्या बरोबर या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
प्रारंभी मुख्याध्यापक तथा पेडणे तालुका शिक्षणाधिकारी नरेंद्र नाईक यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. शिक्षिका सुजाता पार्सेकर हीने गुलाबपुष्प देवून मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक राजेंद्र बोंदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.तालुक्मयातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, विविध शिक्षण संस्था?चे अध्यक्ष, व्यवस्थापक उपस्थित होते.