वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे स्टार मल्ल बजरंग पुनिया व विनेश फोगट लवकरच मैदानात खेळताना दिसणार असून 4 ते 7 मार्च या कालावधीत इटलीतील रोममध्ये होणाऱया मॅटेव पेलिकन कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती फेडरेशनने बुधवारी जाहीर केलेल्या 34 सदस्यीय संघात त्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्बियातील बेलग्रेड येथे झालेल्या विश्व चषक कुस्ती स्पर्धेत या दोघांनीही भाग घेतला नव्हता. रोममधील या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मात्र मानांकन गुण मिळविण्यास ते उत्सुक झाले आहेत. भारताच्या फ्रीस्टाईल संघात दीपक पुनिया, रवि कुमार, नरसिंग यादव यांचा तर ग्रीको-रोमन संघात अर्जुन हलाकुर्की (55 किलो), गुरप्रीत सिंग (77 किलो) या नामवंतांचा समावेश आहे. महिलामध्ये विनेश फोगटसह साक्षी मलिक व अंशू मलिक यांचा समावेश आहे.
जाहीर करण्यात आलेला कुस्ती संघ ः फ्रीस्टाईल ः रवि कुमार, पंकज, बजरंग, रोहित, विशाल कालिरमण, संदीप सिंग मान, नरसिंग यादव, जितेंदर, राहुल राठी, दीपक पुनिया, परवीन चहर, प्रवीण, सत्यवर्त काडियन, सुमित.
ग्रीको-रोमन ः अर्जुन हलाकुर्की, मनीष (60 किलो), नीरज, गौरव डुहून, कुलदीप मलिक, गुरप्रीत सिंग, हरप्रीत सिंग, सुनील कुमार, दीपांशू, नवीन. महिला ः मीनाक्षी, विनेश, नंदिनी बाजिराव साळोखे, अंशू, सरिता, सोनम, साक्षी मलिक, निशा, अनिता, किरण.