मुंबई
ऑटो क्षेत्राकरीता आवश्यक असे सुटे भाग बनवणारी कंपनी रोलेक्स रिंग्जचा आयपीओ आज (28 जुलै) रोजी खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 731 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. सदरचा आयपीओ 28 जुलैला खुला होऊन 30 जुलैला बंद होणार आहे. प्रति समभागाचा दर 880 ते 900 रुपये प्राइस बँड
असणार आहे. 2021 मध्ये दाखल होणारा हा 29 वा आयपीओ असणार आहे.