लकाटे दिले म्हणून मते मिळतनाही खंवटे चालोबोना टोला
प्रतिनिधी /म्हापसा
काहीजण आपण किंग मेकर म्हणतात. किंगमेकर कोण नसतात. लोक सर्वश्रेष्ठ आहेत. टुगेदर फॉर गोवा असणे गरजेचे आहे. आज बार्देशात सातही जागा विजयी होणार. मायकल लोबो कुठल्या बाजूनी बुडतो याचा लोक निर्णय घेणार आहे. ते कचरा मंत्री म्हणून भाजपात होते आज काँग्रेस पक्षात गेले तेथेही कचरा गोळा करण्याचे काम ते करून घेणार आहे. शिवोली वासियांना ओडीपी नको आहे. कळंगुटची गत शिवोलीत नको. लकाटे दिले म्हणून मत मिळत नाही. मायकलने काँग्रेसमध्ये काय केले व काय करणार हे जनतेला माहीत आहे अशी माहिती पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी म्हापसा येथे पत्रकारांशी बोलताना दिली. पर्वरी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर आमदार खंवटे बोलत होते.
पर्वरीसाठी सर्व विकासकामे हाताळली
पर्वरी मतदारसंघातून आपण अर्ज दाखल केला असल्याची माहिती देत पर्वरीचे आमदार तथा उमेदवार रोहन खंवटे म्हणाले की, अपक्ष मंत्री म्हणून सर्व कामे हाती घेतली आहे. पुढे जाताना पूर्ण खात्री आहे की 22 ला 22 आम्ही करणार. आम्ही दोनवेळा अपक्ष म्हणून काम पाहिले व पुन्हा एकदा जनतेसमोर येत आहे. आम्ही जी पर्वरी व राज्यासाठी आश्वासने दिली आहे ती सर्व पूर्णत्वाकडे जाणार आहे असे ते म्हणाले.
ऍड. दयानंद नार्वेकरांचे पर्वरीत स्वागत
दयानंद नार्वेकर अपक्ष म्हणून पर्वरीतून निवडणूक रिंगणात उतरत असेल तर आपण त्यांचे स्वागत करतो. पर्वरी व हळदोणा हे दोन भाग आहेत. डिलीमीटेशन झाल्यावर सातत्याने आम्ही अपक्ष म्हणून काम सुरू केले ते आजवर सुरू आहे. आपल्यावर जो विश्वास ठेवला त्यास आपण पात्र ठरलो आहे. मध्येच कोण येणार आणि रिंगणात उतरणार, असू द्या ही लोकशाही आहे. लोक खूप हुषार आहे. पंधरा दिवसात लोक का येतात हे सर्वांना माहीत आहे. आपल्यास लोकांवर पूर्ण विश्वास आहे. ते मारक ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही सर्व एकमताने ठरविले आहे की राज्यात सर्वात अधित मते पर्वरी मतदारसंघात मिळविणार आहोत. कुणीही मध्येच राजकारणात खेळण्यासाठी आले म्हणून जनता त्यांना खेळण्यास देमार नाही. आम्ही सर्व एकत्रित आहोत. 24X7 आम्ही लोकांबरोबर आहेत. पर्वरीचा विकास करण्यास आम्ही कुठेच कमी पडलो नाही.
घरोघरी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्रित आलो आहे. कोण सेटींग करतात त्याच्यावर पक्ष कारवाई करील. आज जे कुणी फुट घालू पाहतात त्यांचा स्वतःचा काहीतरी फायदा असेल अशी माहिती रोहन खंवटे यांनी दिली.