प्रतिनिधी/ बेळगाव
गोकाक तालुक्मयातील सुलधाळ ग्राम पंचायतीकडून सुरू असलेल्या उद्योग खात्रीअंतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी ज्ये÷ सर्वोदयी समाजसेवक शिवाजी कागणीकर, अडव्याप्पा कुंबरगी व राहुल पाटील यांनी केली. याप्रसंगी काम चालू असलेल्या ओढय़ातून चालत जाऊन शेजारच्या मंदिरासमोर बसून कामगारांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवाजी कागणीकर यांनी उपस्थितांना रोजगार हमी योजनेचा कायदा व त्याच्या माध्यमातून आपण स्वत:ची प्रगती कशी करून घ्यावी, याबाबत माहिती दिली. राहुल पाटील यांनी रोजगाराच्या कामावर व कार्यालयीन कामाच्या ठिकाणी येणाऱया अडचणींबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. काही मदत हवी असल्यास संपर्क साधावा, असे आवाहनही केले.
अडव्याप्पा कुंबरगी यांनी सांघिक बांधिलकी व समन्वयाबाबत माहिती दिली. यावेळी रोजगाराच्या कामावरील महिलांची व पुरुषांची संख्या लक्षणीय होती. महत्त्वाचे म्हणजे कष्टकरी महिलांमधील एका ज्ये÷ महिलेला अध्यक्षाच्या जागी ठेवून हा कार्यक्रम घेतला गेला.