चेन्नई / वृत्तसंस्था
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करवून न घेतल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे. ही लढत मंगळवारी येथील चेपॉक स्टेडियमवर खेळवली गेली होती. आयपीएल कार्यकारिणीने पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
मुंबई इंडियन्सच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात मुंबईने संथ गतीने गोलंदाजी केली होती. अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राने 24 धावात 4 बळी घेतल्यानंतर दिल्लीने मुंबईला 9 बाद 137 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखले आणि नंतर पाच चेंडूंचा खेळ बाकी राखत विजयावर सहज शिक्कामोर्तब केले होते. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 2 विजय व 2 पराभव अशी कामगिरी नोंदवली आहे.