मुंबई
2021 प्रमाणेच यावर्षीही कंपन्या आपला आयपीओ आणण्यासाठी धडपडताना दिसणार आहेत. यात एजीएस ट्रान्सॅक्टचा पहिला आयपीओ असणार आहे. पण दुसरीकडे आता ऑटोमोबाईल क्षेत्रातील लँडमार्क्स कार्स लिमिटेडही आयपीओ आणण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 800 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनी आयपीओकरीता आवश्यक परवानगीसाठी कागदपत्रे सेबीकडे लवकरच सादर करणार आहे.