वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये टी-20 आणि वनडे मालिका खेळत आहे. दरम्यान इंग्लंडच्या चालू असलेल्या या दौऱयात लंकेच्या तीन क्रिकेटपटूंनी बायोबबलमधून बाहेर पडत नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल लंकन क्रिकेट मंडळाने त्यांना तातडीने मायदेशी परतण्याचा आदेश दिला आहे. लंकेच्या कुसल मेंडीस, यष्टीरक्षक डिक्वेला आणि गुणतिलका यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी टी-20 मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यानंतर कुसल मेंडीस, डिक्वेला आणि गुणतिलका हे डरहॅमच्या प्रमुख मार्गावरून भटकत होते. लंकेच्या या तीन क्रिकेटपटूंनी बायोबबलमधून बाहेर पडत फिरावयास गेल्याबद्दल त्यांच्यावर लंकन क्रिकेट मंडळाने तातडीची कारवाई करत त्यांना मायदेशी बोलविले आहे.