वृत्तसंस्था/ कोलंबो
भारताविरुद्ध होणाऱया मर्यादित षटकांच्या मालिकेतील सहा सामन्यांसाठी 23 सदस्यीय लंकन संघाची घोषणा करण्यात आली आहे. दसुन शनाकाकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून गेल्या चार वर्षाच्या कालावधीतील लंकेचा तो दहावा कर्णधार आहे.
लंकेचे क्रीडामंत्री नमल राजपक्षे यांनी मंजुरी दिल्यानंतर लंका क्रिकेटने या संघाची घोषणा केली. नमल हे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे पुत्र आहेत. अलीकडेच कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आलेला कुसल परेरा जखमी असल्याने त्याचा या संघात समावेश झालेला नाही. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो घोटय़ाला झालेल्या दुखापतीतून अद्याप बरा झालेला नाही. इंग्लंड दौऱयाहून परतलेल्या लंका संघातील फलंदाज प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर व डाटा विश्लेषक जीटी निरोशन यांच्याव्यतिरिक्त अन्य एकही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. त्यामुळे या खेळाडूंचाही निवडीवेळी विचार करण्यात आला. रविवारी पहिल्या वनडे सामन्याने या मालिकेची सुरुवात होणार आहे.
लंका संघ ः दसुन शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा (उपकर्णधार), अविश्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निसंका, चरिथ असालंका, वनिंदू हसरंगा, अशेन बंदारा, मिनोद भानुका, लाहिरु उदाना, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुश्मंता चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, इशान जयारत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिता फर्नांडो, कसुन रजिथा, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.